Tuesday, December 18, 2012

अभ्यास सोडा

टीचर : यशस्वी पुरुषाच्या मागेएक स्त्री असते. मुलानो यातून तुम्ही काय बोध घेणार...? . . . . . पिँट्या : हाच कि.... अभ्यास सोडा आता आणि तशी स्त्री शोधायला चला बाहेर.....;P

Monday, December 10, 2012

या जगातील १० सत्य

जगातील १० सत्य : 1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे. २. जाहिराती वाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. ३. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते. ४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी ५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात. ६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे. ७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं. ८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आत्ता ताबडतोब! ९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून! १०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो !! *सुविचार १. पैसा हेच सर्वस्व नव्हे... ­ ... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!! २. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!! ३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!! ४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!! :p

Saturday, November 17, 2012

साहेबांना भावपुर्ण श्रध्दांजली

आज चंचल वारा शांत असेल
आज ती राञ ही गडद भासेल
आज चांद-तारा रडत बसेल
आज सह्याद्रि ही क्षुब्ध असेल
कारण
या सह्याद्रितुन, मराठी मातीतुन,
मनातुन, ह्दयातुन दौडणारा आमचा'वाघ'
आज
निघुन गेला...

Tuesday, October 30, 2012

Shree Gajanan Darshan Shegaon | श्री गजानन दर्शन, शेगाव

॥ गण गण गणात बोतेँ ॥
विदर्भाची पंढरी,
श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, जिल्हाः बुलढाणा
मित्रांनो या लिँक ला आपल्या वॉलवर शेयर करा आणि बाबाचेभक्त वाढवा,
www.facebook.com/shree.gajanan.darshan
जय गजानन!

Monday, October 29, 2012

मराठी ग्राफिटी

मराठी ग्राफिटी

Son of Sardar- Images | सन ऑफ सरदार

इस दिवाली सुपर डुपर फुल कॉमेडी धमाका, अपना पंजाबी मुंडा अजय देवगण और
कुडी सोनाक्षी सिन्हा का जलवा.
ऑल इंडिया रिलिजः 13 Nov

Like and share Official fan page
www.facebook.com/SonOfSardarFans

Sunday, October 28, 2012

Ketki Mategaonkar | केतकी माटेगावकर

मराठमोळ्या केतकी चे उर्फ केवदा चे अप्रतीम फोटो

----------Sent from my Nokia ----------

Thursday, October 11, 2012

कारण मी कधीच रिस्क घेत नाही.

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो, मी चोरपावलाने घरात येतो, माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो, तांबडे बाबा फोटोतून बघत असतात, या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१|| वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो, अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो, तांबडे बाबा मंद हसतअसतात, स्वयंपाकघरात डोकावून बघतो, बायको कणीकच मळत असते, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२|| मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं? ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ! मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो, बाटली मात्र मी हळूचकाढतो, वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो, पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो, काळा ग्लास पण कपाटात ठेवतो, तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३|| मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही.. ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे.. मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा... मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो, मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते, फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एकपेग मारतो, तांबडे बाबा मोठ्ठ्याने हसतात, फळी कणकेवर ठेवून, तांबडे बाबाचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो, बायको गॅसवर मोरीच ठेवत असते, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४|| मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन! ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा... मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो, मोरी धुवून फळीवर ठेवतो, बायको माझ्याकडे बघून हसत असते, तांबडे बाबामहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो, पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही, कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५|| मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे! ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!! मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो, गॅसही फळीवरच असतो.. बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो, मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते, ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही, अर्थात तांबडे बाबा कधीच रिस्क घेत नाहीत.. जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो... कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||

Tuesday, October 9, 2012

पावसता भिजताना

पावसात भिजताना
तूच येतोस जणू जवळ
तुही असाच ओढतोस मिठीत
अगदी जवळ, अगदी जवळ.....
.
.
.
पाऊस पडून गेल्यावर
कस छान मोकळ होत.
तू भेटून गेल्यावरही...
तसच काहीस होत...

प्रत्येक मुलगी सुंदर असते.............



प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते..............
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते............ ...
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते............... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणी कायेने सुंदर असते...........
कोणी मनाने सुंदर असते............
कोणी संस्काराने सुंदर असते...... ..... .
कोणी विचाराने सुंदर असते...........
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते...........
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते............
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
कोणाचे गाणे सुंदर असते............
कोणाचे लिखाण सुंदर असते......
कोणाचे कविता सुंदर असते........
कोणाचे वस्त्र सुंदर असते............
प्रत्येक मुलगी सुंदर असते.............
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......
मनाची सुंदरता विसरू नका............
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करू नका........
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा........

Thursday, September 13, 2012

कुंडली

लग्नाच्या मांडवात नवरा नवरीला :-
''तुला माहितीये, लग्नहोण्याआधी माझी १० मुलींशी लफड होत..!''
.
.
.
.
.
.
.
नवरी हळूच उत्तरली:-
''वाटलंच होतं मला...
आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार ना..!!" :D

Saturday, September 8, 2012

वॉचमन

एका नेपाळी माणसावर
यक्ष प्रसन्न झाला.
यक्ष : सांग बाळा... कुठच्याही
तीन इच्छा सांग.
नेपाळी : एक प्रचंड मोठा बंगला
हवा.
यक्ष : तथास्तु.
नेपाळी : त्यात एक खूप-खूप
श्रीमंत माणूस राहावा.
नेपाळी : आणि त्या बंगल्याचा
वॉचमन म्हणून फक्त माझी
नेमणूक व्हावी.

Friday, September 7, 2012

थोबाड इकडे कर

नवरा बायको जेवत असतात..
नवरा : ए घास भरव ना,
.
.
.
.
.
.
.
.
बायको (कंटाळून) : बरं बर,हे घ्या..
(घास भरवते)
नवरा : मी नाही जा..
अगोदर नाव घे मगचं..
बायको (रागाने) :
.
.
.
.
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे..
(नवरा लाजतो)
चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे
.
.
.
.
.
.
.
घास भरविते मेल्या,
थोबाड कर इकडे..

द्रौपदी

गुरुजी गोट्याला विचारतात,"५ दिवस काम आणि शनिवार, रविवार सुट्टी .. ही प्रथा कुणी सुरु केली?"
गोट्या,
"द्रौपदीने!!" :D :D :D

भावा साठी आणखी एक चटई लावा रे

७ चटईवर ७ साधु बसले होते..
.
बाबु आला आणि म्हणाला -
बाबा मला पोरगी पटत नाही..-
मी काय करू सांगा?
.
साधु म्हणाले --
आजून १ चटई लावा रे भावा साठी ..;);)

कोळसा

देव : अशी एक गोष्ट मग ज्याने तुमचे आयुष्य सुखी होईल ..
अमेरिकन नेता : सोने
अरबी नेता : खनिज तेल
जपानी : जिद्द आणि मेहनत
चीन : प्रखर राष्ट्रवाद
पाकिस्तान : अमेरिकेची मदत
भारत : कोळसा

गमतीदार राशीचक्र

गमतीदार राशीचक्र....... .....
१. मेष - हेच करतात सर्वांचा द्वेष.
२. वृषभ - याचं दर्शन कायम दुर्लभ
...
३. मिथुन - सगळी कामे करतात कुंथून.
४. कर्क - नेहमीच असतात, स्वतःत गर्क.
५. सिंह - बायकोपुढे झुरळ,बाहेर मात्र सिंह.
६. कन्या - चौकात मारी, नेहमीच बात्या.
७. तूळ - डोक्यात नेहमी नवीनच खूळ.
८. वृश्चिक - विंचवाला म्हणे, माझ्याकडून शिक.
९. धनू - माझ्यापुढे कोणाला शहाणे मानू?
१०. मकर - नेहमी चुकवतो"आयकर".
११. कुंभ - कधीही पाहा, नेहमी सुंभ.
१२. मीन - आवडतो पाहायला, हॉट सीन
तुम्ही कोणत्या गटात मोडता.......... .

Saturday, August 25, 2012

समोर तो ब्रिज दिसतोय ना

एकदा मनमोहन सिंघ ओबामाच्या घरी गेला..
त्याचा बंगला बघून मनमोहन ने विचारलं..
इतका मोठा बंगला...
इतके पैसे कुठून आले?
ओबामा - तो समोर ब्रिज दिसतोय?
मनमोहन - हो...
ओबामा - त्यातले १०%खिशात घातले...
काही दिवसांनी ओबामा मनमोहन कडे गेले..
ओबामा - हा तर माझ्या बंगल्यापेक्षा मोठा बंगला आहे..
इतके पैसे कुठून आले?
मनमोहन - समोर तो ब्रिज दिसतोय?
ओमाबा - नाही....
मनमोहन - हा हा हा .....
कळला तर लाईक करा...

पहिला कोण होता

वांद्रय़ाच्या चर्चच्या हद्दीत एक जण थडग्यावर डोकं आपटत म्हणत होता, ‘‘का
मेलास? का मेलास तू?’’
कुणी जवळचा होता का? एकानं विचारलं,तेव्हा तो म्हणाला, ‘‘त्याचे तोंड मी
बघितलही नव्हतं हो.’’
हा माझ्या बायकोचापहिला नवरा होता.
** * **

परदेश दौरा

परदेश दौऱ्यावर मंत्र्यांचा खूप खर्च होतो. तो कमी कसा कराल? यासाठी
मंत्र्यांनी परदेशात गेले पाहिजे व ते देश याबाबतीत काय करतात ते पाहिले
पाहिजे.*
*** * **

दुःखद गोष्ट

तीन मित्रांनी मिळून एक फ्लॅट ५० व्या मजल्यावरचा घेतला. (लिफ्ट) उद्वाहक चालू
नाही असे रखवालदारम्हणाला. आता पायऱ्या चढण्याशिवाय गत्यंतर नाही. वेळ
घालविण्यासाठी तिघांनी ठरविले की, एकाने संस्मरणीय घटना सांगावी, दुसऱ्याने
विनोद सांगावा व तिसऱ्याने दु:खी गोष्ट सांगावी. असे करता करता ते तिथे
दरवाज्याजवळ पोचले. पहिल्या दोघांनी ठरल्याप्रमाणे त्यांच्या वाटणीची कामे
केली होती. तिसरा म्हणाला, ‘‘मी खोलीची चावी आणायला विसरलो, ही माझी दु:खद
गोष्ट आहे.’’
** * **

आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

एकदा एका रात्री सूर्यकांत दारूच्या नशेत जातहोता. त्याचे एक पाऊल फूटपाथवर
तर एक रस्त्यावर पडत होते. पाठीमागून येणाऱ्या हवालदाराने सूर्यकांतला काठीने
मारत विचारले- ‘‘काय रे, इतकी प्यायला कुणी सांगितली.’’
सूर्यकांत स्वत:लासावरत म्हणाला, ‘‘आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, गेला एक
तासभर मी लंगडत का चालतो आहे.. याचाच विचार करत होतो.’’*
*** * **

इमोशनल अत्याचार

घटस्फोटाचा खटला चालू होता. न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं, ‘तुम्हाला
घटस्फोट कशासाठी हवा आहे?’
पत्नी- ते माझा मानसिक छळ करतात.
न्यायाधीश- तो कसा?
पत्नी- आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात, आणि मी उत्तर देऊ लागले की कानाचं
श्रवणयंत्र बंद करून ठेवतात.

तिच्या फोनची वाट पाहतेय

‘‘का गं नीता, अर्धा तास कानाला फोन लावून बसली आहेस, कोणाचा फोन आला आहे
गं?’’ आईने नीताला विचारले.
‘अगं कोणाचाही फोन आलेला नाही. अमृता मला फोन करणार आहे,म्हणून मी फोन उचलून
तिच्या फोनची वाट पाहते आहे.’ नीताने उत्तर दिले.

कसं होणार या मुलीँचं

आजचा किस्सा !
गण्या बाईकने चालल होता आणि...
अचानक एक मुलगी गण्याच्या bike ला मागून धडक देते !
गण्या : ए मंद आहेस का! ब्रेक लावायला काय पैशे पडतात??
ती : माझ्या पण activa ला खरचटला आहे काय....
गण्या : bike ची numberPlate तुझ्यामुळे चेम्बली त्याचा काय!
ती : रे मी मुद्दाम नाही केलं, माझी exam आहे १० मिनिटाने plz अरे !
गण्या : हम्म्म... ठिक हाय ठिक हाय...
ती : चल बाय .....टेक केअर..!
.
.
.
(आणि सुसाट गाडी चा pickup घेत "पुढच्या गाडी वाल्या ला धडकली" :D )
कसा व्हायचं या पोरींचं देव जाणे..! :p:D

टन टन टन

सर : एक हजार किलो म्हणजे एक टन,
तर सांग पाहु गण्या...
तीन हजार किलो म्हणजे किती?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू : टन टन टन! :p
(चला मित्रांनो शाळासुटली. हजेरी द्या आणी झोपुन जा ;)...)

आत्ताशी कुठे विशीची आहे

एक कॉलेजची मुलगी कॉलेजला जायला उशीर झाला म्हणून बेदरकारपणे अतिशय फास्ट
स्पीडने कार चालवून सिग्नल तोडून गेल्यामुळे एका पोलिसाने तिलाथांबवलं.
पोलीस तिला म्हणाला-मॅडम, चाळीसच्या पुढे गाडी चालवायची नाही हे तुम्हाला
माहीत नाही का?
ती मुलगी म्हणाली, मी आत्ताशी कुठे विशीची आहे!

फोन माझ्यासाठी होता

फोन वाजताच रोहनने आपल्या पत्नीला- मोनाला सांगितलं,
‘‘ फोन जर माझ्यासाठी असेल तर मी घरात नाहीए म्हणून सांग.’’
मोनाने फोन उचलला आणि सांगितलं, ‘‘तो घरात आहे.’’ रोहन म्हणाला, ‘‘सांगू नको
म्हणून सांगितलं होतं ना.’’ मोनानं उत्तर दिलं, ‘‘फोन माझ्यासाठी होता.’’

चष्मा घरी विसरलोय

रस्त्यात बाबूराव आणि छबूराव यांचे भांडण जुंपले तेव्हा बाबूराव तावातावाने
छबूरावावर ओरडले, ‘बघतो तुला नंतर..!’ त्यावर छबूराव आवेशाने उद्गारले,‘का?
नंतर कशासाठी? आताच का नाही?’, ‘कारण मी चष्मा घरीविसरलोय’ काढता पाय घेत
बाबूराव बोलले.

चष्मा घरी विसरलोय

रस्त्यात बाबूराव आणि छबूराव यांचे भांडण जुंपले तेव्हा बाबूराव तावातावाने
छबूरावावर ओरडले, ‘बघतो तुला नंतर..!’ त्यावर छबूराव आवेशाने उद्गारले,‘का?
नंतर कशासाठी? आताच का नाही?’, ‘कारण मी चष्मा घरीविसरलोय’ काढता पाय घेत
बाबूराव बोलले.

कोमट पाणी

बाबूरावाना तपासून डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्हाला मलावरोधाचा त्रास आहे. तुम्ही
रोज सकाळी उठताच ग्लासभर कोमट पाणीप्या.’’ त्यावर बाबूराव उद्गारले,
‘‘डॉक्टरसाहेब, हे तर मी गेली कित्येक वर्षे करतो आहे. फक्त आमची ‘ही’ त्या
पाण्याला ‘चहा’ म्हणते.’’

Friday, August 24, 2012

अरे लाइट लावा

हेमा अशोकबरोबर पहिल्यांदाच सिनेमा पाहायला गेली. सिनेमा सुरू होण्यापूर्वी
थिएटरमध्ये अंधार केला गेला. तेव्हा हेमा एकदम ओरडली. अरे लाईट लावा, अंधारात
सिनेमा कसा बघणार?

Wednesday, August 22, 2012

तिकीट

शिक्षक - गण्या... सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे...?
.
.
.
.
.
.
गण्या - कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायवर जर झोपला....
तर सर्वांचच तिकीट निघेल... :p :D :D
गण्या Rocks ;)

नव्या पिढीचा लाकुडतोड्या

लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल...
तसंच काहीसं एकदा झालं...
चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते.
तो रडत असतो इतक्यातएक देवी येते..
तो देवीला सगळी कहाणी सांगतो..
देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते..
देवी - हीच आहे का तुझी बायको?
चम्प्या - हो हो हीच आहे..
देवी - खोटं बोललास तर तुला शिक्षा देईल..
चम्प्या - देवी मला माफ कर..मी खोटं बोललो..
देवी - का बोललास खोटं...आता तुला शिक्षा देणार मी..
चम्प्या - माफ कर देवी.. मी जर कॅटरीना ला नाही म्हणालो असतो..तर तू करीना घेऊन आली असतीस..आणि मी तिलाही नाही म्हणालो असतो तर तू मला माझी बायको दिलीअसतीस..
आणि मी बायकोला हो म्हणालो असतो तर तू माझ्यावर खुश होऊन मला तिन्ही बायका दिल्या असत्यास..
मी खूप गरीब आहे..मला एकच परवडत नाही...३ कधी परवडणार?
देवी - अब रुलायेगा क्या पगले... घेऊन जा जा कॅटरीना ला..
मॉरल - माणसं इमानदारीने गेम खेळतात..

Tuesday, August 21, 2012

मुंग्या vs कोळी फुटबॉल मॅच

एक दिवस
मुंग्या विरुद्धा कोळी अशी फूटबॉलची मॅच
असते.
मुंग्या ना 6 पाय आणि कोळ्या ना 8 पाय
त्यामुळे कोळी दणादण गोल मारतात.
मग interval नंतर मुंग्यांकडून गोम
खेळायला येतात ......
तिला 100 पाय....
त्यामुळे त्या न
थांबता गोल च गोल मारतात
आणि मुंग्या जिंकतात....
मग पत्रकार परिषदमधे सगळे वा वा thanks
गोमा,
तुमच्यामुळे मुंग्या जिंकल्या वगैरे असे कौतुक
करतात ...
पण एक खडूस पत्रकार विचारतो
"तुमच्या मुळे मुंग्या जिंकल्या वगैरे ठीक आहे
पण interval परन्त वेळ का लावला???
भाव खायला काय?".........
तर गोमा मान हलवत म्हणतात
"नाही हो, आधीच येणार होतो पण बूट
घालण्यात फार वेळ गेला !!!!

काही मजेशीर व्याख्या , काही कधीतरी वाचलेल्या , तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का ?

 

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.
बघा आवड्तायेत का?

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

 

श्रेष्ठ विचार

कई लोगोँ की मान्यताहै कि ईश्वर
को पाने के अनेक रास्ते हैँ। लेकिन सोचने
वाली बात है कि अनेक रास्ते किसके लिए
होते हैँ?... जो चीज एकजगह स्थित
होती है। जैसे मान लेँ अमेरिका, वहाँ जाने के
लिए अनेक रास्ते हैँकोई वायुमार्ग से
जाएगा, कोई सड़क से, तो कोई जहाज से
जाएगा क्योँ?.. क्योँकि अमेरिका एक जगह
स्थित है। वहीँ हम देखेँ, हवा, जो सभी जगह
व्याप्त है उसे केवलनाक के
द्वारा ही ग्रहण किया जा सकता है
किसी और अंग कान, आँखआदि के
द्वारा नहीँ।
इसी तरह चूकि वो ईश्वर सर्वव्यापी हैँ
इसलिए उनके पाने का रास्ता भी केवल और
केवल एक ही हो सकता है अनेक नहीँ। हमारे
सभी धार्मिक ग्रंथोँ ने परमात्मा-
प्राप्ति का केवल एकही मार्ग बताया है।
वो है- एक ऐसे पूर्ण गुरु
की शरणागति जो हमेँ दस बीस मार्गोँ मेँ
ना उलझाए बल्कि उस एक ही शाश्वत,
सनातन मार्ग मेँ दीक्षित कर देँ। अर्थात
वो दीक्षा के ही समय हमेँ दिव्य-
दृष्टि प्रदान कर परमात्मा के तत्वरुप
का दर्शन करा देँ। जिसे रा0च0मा0 मेँ
प्रकाश, बाइबल मेँ divine light, कुरान मेँ
नूर, गुरुवाणी मेँ ज्योति कहा गया। शब्द
बेशक अलग हैँ पर है सब एक ही। श्रीकृष्णने
भी अर्जुन से कहा-"दिव्यं ते
ददामि चक्षुः पश्य मे योगमैश्वरम।
अर्थात मैँ तुम्हेँ वो दिव्य-दृष्टि देता हूँ
जिससे तू मेरे वास्तविक स्वरुप को देख
पाएगा।"
उसके दर्शन के बाद ही हमेँ समझ आती है
कि हम हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई
को अलग-अलग समझते हैँ लेकिन वास्तव मेँ हम
सब उस एक परम-ज्योति के ही अंश हैँ और
इसलिए आपस मेँ भाई-भाई हैँ।