Wednesday, February 5, 2014

देवमाणूस

रात्रीचे अकरा वाजले असावेत आणि माझे लिखाण कार्य सुरू होते. तितक्यात दार ठोठावले गेले. मला आश्चर्य वाटलं की इतक्या रात्री भर पावसात कोण आहे मी भीत-भीत दार उघडले. पाहिले तर समोर माझा मावसं भाऊ सुधीर उभा होता. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या बरोबर वीस-बावीस वर्षाची तरुणीपण होती. तो म्हणाला''प्रकाशमला फक्त एक रात्र तुझ्या घरी थांबायचे आहे. उद्या सकाळी मी तिची सोय दुसरीकडे करून देईन.'' माझ्या घरी त्या वेळेस मी एकटाच होतो. माझी बायको तिच्या माहेरी पुण्याला गेली होती. ही गोष्ट माझ्या शेजार-पाजाऱ्यांसकट पूर्ण कॉलोनित माहीत होती. अशा परिस्थितीत एका तरुणीला घरी थांबवण्याकरिता मी समाजामध्ये आपल्या व्हाईट कालर इंभ्रती ला पाहून नकार दिला. त्या वेळेस मला कुठे तरी वाचलेले बोध वाक्य'दया ही दु:ख का कारण है'प्रमाणे वागल्याबद्दल मानत अभिमान वाटत होता. बरीच दिवस झाली माझ्या भावाची भेट झालेली नव्हती, शिवाय त्या मुलीचे काय झाले? तिला कोणी आसरा दिला? हे जाणून घेण्याची उत्कण्ठा मनाला लागलेली होती म्हणून एका रविवारी मुद्दाम माझ्या भावाला भेटण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. माझ्या भावाच्या घरी मी जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथेच बरीच मंडळी जमलेली होती व बहुतेक तिथे राखी बांधण्याच्या प्रोग्रॅम चालला होता. कारण त्या दिवशी भावासोबत माझ्या घरी आलेली ती मुलगी भावाला राखी बांधत होती. मी दिसल्या बरोबर सुधीर ने माझी मागली वागणूक विसरून माझे स्वागत केले व म्हणाला''प्रकाशत्या दिवशी तू समाजाला भिऊन श्वेताला मदत देण्यास नाकारले, पण तुला त्या गरीब व निराश्रित मुलीची कथा माहीत नाही. ती एका गरीब व आई नसलेल्या बापाची मुलगी होती. शिवाय तिच्यावर तिच्या म्हाताऱ्या व अपंग वडिलांसकट तीन भावंडांना सांभाळायची जबाबदारी पण होती. शेवटी घरची गरिबी व समाजाची बोलणी याला त्रासून तिच्या बापाने तिच्याहून जवळ-जवळ 20 वर्ष अधिक वयाच्या श्रीमंत माणसाबरोबर तिचे लग्न लावून दिले.वयमानाप्रमाणे एक दिवस अचानक हार्ट फेल होऊन त्याचा मृत्यू झाला. ती मला एका लग्न समारंभात भेटली होती व मला तेव्हा बोलता-बोलता सहज म्हणाली होती की कदाचित कधी मला कोणी भाऊ असता तर तुझ्या सारखाच असता. बहुतेक हे नात मनात धरूनच तिनी मला फोन केला.मी तिच्या घरी गेलो पण ते लोक सहजा सहजी तिला सोडायला तयार नव्हते. त्यांनी आमच्या दोघांच्या संबंधांवर देखील प्रश्न उचलले व माझ्याशी मारहाणपण केली. मी तिला कसेबसे त्यांच्या तावडीने सोडवले पण त्यांना आम्हाला मारण्यासाठी काही गुंड आमच्या पाठीमागे पाठवले. म्हणूनच मी त्या दिवशी तिला तुझ्याकडे आणले होते. सकाळी तुझ्या वहिनीला सर्व हकीकत सांगितली व तिनीही त्या दिवशी माझ्या हातून एक चांगले काम घडले याचे कौतुक केले. मी आता लवकरच एका चांगला शिकलेला गुणी व सुशीला मुलगा बघून तिचे लग्न लावून देईन व मोठा भाऊ म्हणून तिचा कन्यादान पण मीच करणार आहे.सुधीरने सांगितलेली सर्व हकीकत ऐकून मला सुधीरच्या मोठेपणाचा अभिमान वाटू लागला. आणि योगायोगाने तेव्हा रेडिओवर एक जुने गाणे वाजत होते. 'हवे कशाला पंढरपूर नकोस जाऊ इतक्या दूर मनी विठूचा संग करी भवसागर हा पार करी''. आपल्या पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये लिहिले आहे की पृथ्वी ही शेषनागच्या फणावर टिकलेली आहे पण माझा तर विश्वास आहे की पृथ्वी फक्त सुधीर सारख्या असंख्य देवमाणसाच्या सत्कर्माच्या बळावरच आपल्या जागेवर आहे.

No comments: