Tuesday, December 18, 2012
अभ्यास सोडा
टीचर : यशस्वी पुरुषाच्या मागेएक स्त्री असते.
मुलानो यातून तुम्ही काय बोध घेणार...?
.
.
.
.
.
पिँट्या : हाच कि....
अभ्यास
सोडा आता आणि तशी स्त्री शोधायला चला बाहेर.....;P
Monday, December 10, 2012
या जगातील १० सत्य
जगातील १० सत्य :
1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
२. जाहिराती वाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे.
३. माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.
४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.
६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आत्ता ताबडतोब!
९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!
१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो !!
*सुविचार
१. पैसा हेच सर्वस्व नव्हे... ... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात!!!
२. प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात!!!
३. पाणी वाचवा...... बीअर प्या!!!
४. शेजाऱ्यावर प्रेम करा...... पकडले जाऊ नका म्हणजे झालं!!! :p
Saturday, November 17, 2012
साहेबांना भावपुर्ण श्रध्दांजली
आज चंचल वारा शांत असेल
आज ती राञ ही गडद भासेल
आज चांद-तारा रडत बसेल
आज सह्याद्रि ही क्षुब्ध असेल
कारण
या सह्याद्रितुन, मराठी मातीतुन,
मनातुन, ह्दयातुन दौडणारा आमचा'वाघ'
आज
निघुन गेला...
आज ती राञ ही गडद भासेल
आज चांद-तारा रडत बसेल
आज सह्याद्रि ही क्षुब्ध असेल
कारण
या सह्याद्रितुन, मराठी मातीतुन,
मनातुन, ह्दयातुन दौडणारा आमचा'वाघ'
आज
निघुन गेला...
Subscribe to:
Posts (Atom)



