Friday, July 13, 2012
बघ आता तुझी अक्कल कशी वाढत आहे :p
एक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्याकरड्या रंगाच्या तीन गोळ्यांनकडे एकटक पाहत बसला होता
तेवढ्यात तिथे आपला झंप्या येतो, झंप्याने विचारले,”या कशाच्या गोळ्याआहेत...?? ”
दारूड्याने उत्तर दिले,”अकलेच्या गोळ्या आहेत या, या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते...”
झंप्या ,“असं आहे का...?” मग मला एक दे कि,
झंप्याने त्याच्या हातातली एक गोळी घेऊन खातो आणि वरून पटकन पाणी पिले,
थोड्या वेळाने झंप्या म्हणाला,”मी एक गोळी खाल्ली आहे खरी पण मला तर काही फरक वाटत नाही आहे”
“तुला कदाचित अजून गोळ्या घ्याव्या लागतील तेंव्हा केंव्हा फरक पडेल”,दारुडा म्हणाला
म्हणून झंप्याने अजून एक गोळी घेवून वरून पाणी पिऊन गिळली
थोड्या वेळाने झंप्याने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला
त्याने त्या गोळीचा बारीक तुकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघूलागला.
अचानक त्या गोळीचा तुकडा तोंडातून थुंकून टाकत झंप्या म्हणाला,” काय बे याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो दारुडा म्हणाला,” बघ बघ आता तुझी अक्कल वाढत आहे"
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment