आई आणखी बाबा यातुन,
कोण आवडे अधिक तुला ?
आई दिसते गोजिरवाणी,
आई गाते सुंदर गाणी,
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती,
बनवायाला सहज तिला !
आई आवडे मला.
गोजिरवाणी दिसते आई, शक्तिवान किती असती बाबा..
थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !
घरात करते खाऊ आई,
घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन् चॉकलेट तर,
बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !
कुशीत घेता रात्री आई,
थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे,
सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे मला.
No comments:
Post a Comment