Saturday, January 12, 2013

खुडलेला प्रेमांकुर

खुडलेला प्रेमांकुर (भाग-१)

(आयुष्यातील काही क्षण कोणासोबत वाटता येत नाहीत, ते क्षण फक्त आठवणी
बनून राहतात. लेखणी हा सुद्धा एक सुंदर दोस्त आहे ज्याला आपण आपल्या
भावना सांगून आपले मन हलकेकरू शकतो. यामुळे कोणाला काही कळत नाही, आपले
मनही हलके होते आणि आठवणीही ताज्या राहतात.)
परीक्षा संपली कॉलेजमधून सगळे बाहेर आले. ती त्याची वाट पाहत बसली होती.
गेटवर खिळलेली तिची नजर आणि त्यातील आतुरता स्पष्ट दिसत होती. अगोदरच्या
काही दिवसात वाढलेले तेढ आणि नुकतंच माहित झालेलं एक कटू सत्य याचा विचार
तिच्या मनात घोळत होता. त्याची वाट पाहतेय पण तो आल्यावर त्याला कसं
सांगायच याची भीती तिला वाटतहोती तिचा थरकाप उडाला होता. या सगळ्या
विचारात धुंद असताना अचानक समोरून तो येताना दिसला. हिची भीती वाढू
लागली. त्याची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या जवळ आला. नेहमीप्रमाणे
तिची थट्टा करू लागला. पण हिच्या चेहऱ्यावरच्या हरकती आज त्याला साथदेत
नव्हत्या. त्याच्या विनोदांनाआज कोणताच प्रतिसाद नव्हता. तिचा चेहरा
पुरता ओशाळला होता. डोळ्यातले अश्रूही आज साथ देत नव्हते. काही
दिवसांपूर्वीचे भांडण आणि निवळत जाणारे गैरसमज हे त्यामागचे कारण असावे
असे त्याला वाटत होते. त्याला तिचा थोडा राग आला पण त्याच्या प्रेमापुढे
हा राग शुल्लक होता. ती हळूच म्हणाली,"तुला काहीतरी सांगायचं". त्याला
वाटले काहीतरी रोजच्याप्रमाणे सांगेल म्हणून त्याने तितकसं महत्व दिले
नाही. आणि मी येतो मग सांग असे म्हणून निघून तोगेला. पुन्हा मित्रांमध्ये
मिसळला. ही त्याला पाहतच राहिली आणि पुन्हा विचार करायला लागली. इतक्या
आनंदी असणाऱ्या ह्याला हे कसं सांगावं? या विचाराने ती चकराऊन गेली.
थोड्या वेळाने तो पुन्हा तिच्या जवळ आला. आज ती एकटीच थांबली होती.
नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणी नव्हत्या. ती म्हणाली तुला काही महत्वाचं
सांगायचय. त्याने होकारार्थी मान हलवली. तिने सांगितलं,"माझ्य ा पप्पानी
माझं लग्न ठरवलंय, याचं वर्षी आहे."हे शब्द ऐकून तोथंड पडला, पण तिला
समजू नये म्हणून थट्टेच्या सुरात बोलला,"congratu lation"आणि पुन्हा येतो
असं बोलून निघून गेला. तिला दिसेनासाझाला. ती त्याची वाट पाहत पुन्हा
तिथेच बसून राहिली. आणि तो दुसरीकडे जाऊन शांत बसला, त्याला धक्का बसला
होता. डोळ्यातले अश्रू आवरेनासे झाले होते.
खुडलेला प्रेमांकुर(भाग-२)
याला काही दिवसांपासून ज्या गोष्टीची चाहूल होती ते आज त्याने तिच्याच
तोंडून ऐकले होते. तरीही ते अश्रू बाजूला सारून त्याला आता तिला सावरायचे
होते.
तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि'चल निघूया'असं म्हणाला. दोघे निघाले, त्याचे
शब्दच थांबले होते. ती त्याला म्हणाली,"खूप मजा वाटतेय ना,"congratulat
ion"बोलायला". तो पुन्हाम्हणाला, मग अजून काय करू? लग्न तुझ्या वडिलांनी
ठरवलंय आणि तुला विचारूनच ठरवलं असणार मग आता मी काय करणार..? तिच्या
चेहर्यावरची जागा आता मात्र अश्रुनी व्यापली होती. याच्या मनात कालवाकालव
होत होती पण तो काय करणार होता. त्याला ते अश्रू काट्यांसारखेभासायला
लागले. मग त्याने समजावणीच्यासुरात म्हंटले,"सोनू, काही होत नाही. मी आहे
ना? मी ठीक करतो सगळं, फक्त मला तुझी साथ हवी आहे. असं म्हणत त्याने
रिक्षाला हात दाखवला, आणि दोघं रिक्षात बसले, तीच्या डोळ्यांतून अश्रू
थांबण्याचे नाव घेत नव्हते. ह्याने प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि
म्हणाला"नको घाबरू गं, आपण सगळं बरोबर करू, मी बोलतो तुझ्या पप्पांबरोबर,
मी सांगतो त्यांना सगळं."तिला थोडा आधार मिळाला पण ती म्हणाली,"माझे
पप्पानाही ऐकणार, ते आपलंच खरं करणार, आणि हे लग्न करून राहणार"आणि
पुन्हा रडायला लागली. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला विश्वास
ठेव सगळं व्यवस्थित होईल. ती त्याच्या मिठीत हरवून गेली. थोडं दुख कमी
झालं पण पुढे काय बोलावं त्याला काहीच सुचत नव्हतं. कोणतही दुख किंवा
काळजी असली कितो तिला मिठी मारायचा आणि त्याचा सगळी काळजी दूर व्हायची.
तिच्या बाहुंमध्ये जणू ही एक जादू होती.
रिक्षा थांबली, दोघेजण उतरले. आता तो तिला निरोप देत होता आणि उद्या
पुन्हा भेटायचं असं आश्वासन घेत होता. पण आज तिच्या जाण्यात काही वेगळेच
दुख होते. मला कायमची सोडून नको जाऊ असं त्याचं मन म्हणत होतं. ती निघून
गेली आणि हा तिच्याकडे पाहताच राहिला."bye"म्ह णू नको असं त्याचा नेहमीचा
हट्ट असायचा. कारण त्यामुळे कुठेतरी दूर जातोय असं वाटतंअसं त्याचं
म्हणणं होतं आणि ते तिलाही नकळत पटलेलं होतं. तिची एक सवय त्याला आजही
खटकली होती. जाताना ती एकदातरी मागे वळून पाहिलं असं त्याला वाटायचं पण
तिने मागे पहिलेच नाही.

No comments: