Monday, April 30, 2012

घर मे पडा हो सोना, तो काहे को रोना...

बप्पी लहिरी कधी ही रडत का नाही..
.
.
.
.
.
.
कारण जब घर मे पडा हो सोना तब काहे को रोना...

डिस्काउंट

एक मुलगी बाजारात सफरचंद विक्रेत्याला)मुलगी: ओ भाऊ, सफरचंद कसे दिले?
विक्रेता: ताई 100 ला 10 बघा...
मुलगी: अहो काहीतरी कमी करा ना..
.
.
.
.
.
.
.
.
विक्रेता: चला फक्त तुमच्यासाठी कमी करतो, 80 ला 8 घेऊन टाका..
मुलगी: आत्ता कस.............
ये हुई ना बात.

मै करु तो साला कॅरेक्टर ढिला है..

मनमोहन सिंग : पैसो का नशा प्यारे नशा सबसे नशीला है जिसे देखो यहा वो भ्रष्टाचार कि बारिश में गिला है ...
.
.
अण्णा हजारे: इसे खतम करणे के लिये तो ये रामलीला है..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
रामदेव बाबा : ओर में करू तो साला कॅरेक्टर ढिला है!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

समोसे

झंप्याची बायको - कुठे आहेस रे?
झंप्या - अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?
ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन.....
झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) - हो हो जान !! आठवतं ना...
झंप्या - बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..
येतो १० मिनिटात...:P

हरामखोर

एक जळजळीत सत्य...............
जेव्हा एखादा मुलगा उलट्या(omating)करतो तेव्हा त्याला बोलतात...........
हरामखोरा एवढी दारु ढोसतात का ???????......
आणि जेव्हा एखादी मुलगी उलट्या करते तेव्हा तिला म्हणतात..........
कोण आहे तो हरामखोर ???????
तात्पर्यः
उलट्या कोणीपण करो हरामखोर कायम मुलेच राहणार)

महाराष्ट्र वीज मंडळ

विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!

Sunday, April 29, 2012

निवडणुका

एकदा ४ महाविद्यालयीन तरुणांना देव भेटला आणि म्हणाला - "मी तुम्हाला १ कोटी रुपये दिले तर तुम्ही काय करणार ?"
पहिला - मी ते पैसे बँकेत 'फिक्स डीपोझिट' मध्ये ठेवेल आणि त्याच्या व्याजावर माझा चरितार्थ चालवेल.
दुसरा - मी ते पैसे शेअर बाजारात गुंतवेल आणि 'ते वाढतील' याची तरतूद करेल.
तिसरा - मी ते पैसे वापरून स्वतःची कंपनी टाकेल आणि ती कंपनी हळूहळू मोठी करेल.
चौथा - मी ते पैसे लोकांमध्ये वाटून टाकील.
देव 'चौथ्यावर' जाम खुश झाला आणि देवाने त्याला खरोखरच १ कोटी रुपये दिले.
काही वर्षांनी -पहिला - 'सामान्य माणूस' म्हणून जगला आणि शेवटी महागाईला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
दुसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून ते शेअर बाजारात लावू लागला आणि नंतर शेअर दलाल झाला.
तीसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून त्याने स्वत:ची कंपनी काढली आणि आता तो एक छोटासा उद्योजक आहे.
चौथा - आज एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. तो आजही पैसे वाटतो आणि त्याच्या पैसे वाटण्याच्या सोहळ्याला 'निवडणुका' असे गोंडस नाव मिळाले आहे ..............

रेखा ऑँटी

अभिषेक (फोनवरून ) आई ला - आई आई माझ्याकडे एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट ..
पहिली कोणती सांगू ???
जया - आधी चांगली सांग ...
अभिषेक - सचिन तेंडूलकर आता राज्यसभेत खासदार होणार ...
जया - वाव ग्रेट !!! आता मला चांगल्या लोकांबरोबर काम करता येणार ,आणि वाईट बातमी काय आहे ?
अभिषेक - रेखा ऑन्टी पण आता तुझ्याबरोबर संसदेत बसणार ...:P :D

SMS फ्रि नाहित हो..

शिक्षिका:- गाढवा, दिवसभर वर्गात मुलींशी गप्पा काय मारतोस??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या:- बाई, मी गरिब घरचा आहे मला SMS फ्री नाहित हो..!

एवढं बिल कसं???

जोक समजला तरच लाईक करा...
८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता,..
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
...
...
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते...
...
मी कशाला घराचा फोन वापरू...
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय...
मी कशाला घराचा फोन वापरू...
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस???

Saturday, April 28, 2012

आता कशी अक्कल वाढत आहे बघ..

एक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्या करड्या रंगाच्या तिन गोळ्यांकडे एकटक पाहत बसला होता. तेवढ्यात तिथे संतासिंग आला.
संताने त्या दारुड्याला विचारले, '' या कशाच्या गोळ्या आहेत?'
'दारुड्याने उत्तर दिले, '' अकलेच्या गोळ्या ... या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते''
'' असं आहे का? ... मग मला एक दे की'' संताने त्याच्या हातातली एक गोळी घेवून खाल्ली आणि वरुन पटकन पाणी पीले.
थोड्या वेळाने संता म्हणाला, '' मी एक गोळी खाल्ली आहे खरी .. पण मला तर काही फरक वाटत नाही आहे''
'' तुला कदाचित अजुन गोळ्या घ्याव्या लागतील... तेव्हा कुठे फरक पडेल'' दारुडा म्हणाला.
म्हणून संताने अजून एक गोळी घेवून वरुन पाणी पिवून गिळली.
थोड्या वेळाने संताने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला. त्याने त्या गोळीचा बारीक तूकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघू लागला.
अचानक त्या गोळीचा तूकडा तोंडातून थूकून टाकत संता म्हणाला, '' काबे... याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे''
तो दारुडा म्हणाला, '' बघ... आता कशी तूझी अक्कल वाढत आहे''

पाण्याचा पोपट

पाण्याचा पोपट कसा करायचा
पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही
बादलीचा पोपट कसा करायचा
नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाही
नळाचा बादलीचा आणि पाण्याचा पोपट कसा करायचा
नळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची........:

खा, प्या मजा करा पण पैशाचा लाड नाही करायचा.

या गरमी मध्ये कुल जोक...
मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
मुलगा : आई म्हणाली खा, प्या मजा करा... पण पैशाचा लाड नाही करायचा...!

शॉर्ट स्कर्ट

शिक्षक : आज शॉर्ट स्कर्ट का बर घालून आली आहेस ??
.
.
विद्यार्थिनी : सर , आज हाफ डे आहे ना म्हणून .
आणि फुल डे ला फुल ड्रेस घालून येते.
.
.
.
सर्व विद्यार्थी जोराने ओरडायला लागले, " सर, सुटीच्या दिवशी पण क्लास घ्या ना " ... ;D ;D

रजनिकांत

दोन भुत राञी फिरत असतात..
एक जण म्हणतोः यार मला खुप भीती वाटते रे..
आपण इतक्या राञी बाहेर पडायला नव्हतं पाहिजे..
दुसरा भुतः (त्याला धिर देत) असा घाबरु नकोस..
सर्व मनाचे खेळ असतात..
असं रजनीकांत वगैरे काही नसतं रे जगात..

बोलता बोलता चंद्रावर येउन पोचलो..

रात्रीचे दोन दारुडे फुल्ल टाईट होऊन डुलत-डुलत चाललेले असतात.
रस्त्यात त्यांना एक पाण्याचं बर्यापैकी मोठं डबक दिसतं.
पहिला दारुड्या : अरे, हे बघ इथं काय आहे.
दूसरा दारुड्या : अरे काय तरीच काय. हा तर चंद्र आहे.
पहिला दारुड्या : अरे बापरे, चल घरी चल लवकर.
आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो..

Sunday, April 22, 2012

प्रेम

"पत्रकार ( सचिन तेंडूलकर च्या बायकोला) :- "अंजलीजी, सचिन तुमच्या पेक्षा वयाने लहान आहे, तरी तुम्ही सचिनशी लग्न का केले ?
"अंजली तेंडूलकर त्या पत्रकाराला कालनिर्णय दाखवितात आणि पुढे म्हणतात, :- "एका आठवड्यात सात दिवस असतात, त्यांपैकी कोणता दिवस मोठा व कोणता दिवस छोटा हे तुम्ही सांगू शकता काय ?
"पत्रकार :- नाही सांगू शकत, कारण दिवसांची नावे वेगळी असली तरी दिवस सारखेच असतात !!
अंजली तेंडूलकर :- "त्याच प्रमाणे प्रेम हे सर्वांचं सारखंच असतं, हृदयातून होत असतं ........ वयोमान, छोटा-मोठा, जाती-धर्मावरून होत नसतं !!"

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा..

मित्रांनो आपण नेहमीच म्हणतो कि ....
फक्त गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा ...
पण कळेल का हो ....
नक्की कसला माज आहे आपल्याला ....
देशात सर्वात जास्त महाराष्ट्रातील लोक आत्महत्या करतात याचा माज आहे कि...
सुरेश कलमाडी , अशोक चव्हाण महाराष्ट्राचे याचा माज आहे ....
विदर्भातील शेतकरी मरत असताना पश्चिम महाराष्ट्रात उस दर जास्त दिला जातोय याचा माज आहे कि
पट पडताळणीत २०००० हून अधिक शाळा बोगस निघाल्या याचा माज आहे ...
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर आहे याचा माज आहे कि
परराज्यातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्त्यांवर हल्ला करतो याचा माज आहे....
गडचिरोलीतील नक्षलवाद संपवू शकलो नाही याचा माज आहे कि
नंदुरबारमध्ये आजही कुपोषणाने बालके मरतात याचा माज आहे ....
गणपतीत नको तसे नाचून संस्कृती हरवून बसवून याचा माज आहे कि
दहावी पर्यंतच्या शिक्षणाला काहीच किमत राहिली नाही याचा माज आहे ...
कोकण वासियांना नको असताना जैतापूर प्रकल्प त्यांच्यावर लाद्तोय याचा माज आहे कि
चांगले प्रोजेक्ट महाराष्ट्राला BYE BYE करून गुजरातमध्ये चाललेत याचे माज आहे ...
मित्रानो विचार करा ...
प्रगत महाराष्ट्र म्हणून, डोळ्यावर पट्टी बांधून आपण या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक करू शकत नाही ....
आज विदर्भातील शेतकरी कापसाला चांगला भाव मिळावा म्हणून या निष्क्रिय अशा सरकार विरुद्ध संघर्ष करत आहे ...
हि लढाई त्याची एकट्याची नाही...
ती आपली पण आहे ...
शेवटी बळीराजा सुखी तरच देश

शोधुन दाखव

ईंजिनिअरचा विद्यार्थी: आम्ही कशापासुन कशाचाही शोध लावु शकतो..!!
.
.
.
.
.
.
.
.
हॉस्टेलचा मेसवाला(पुणेरी): गाढवा,
आज जेवणात भाजी कशाची आहे ते आधी शोधुन दाखव..!!!:-D :-D :-D:-

मुलीँचे रक्त पिणे कठीण

म्हातारा मच्छर:- आमच्या काळात तरुण मुलीच रक्त पिणे हे खुप कठीन होते.
त्याचा नातु:- का बरे......????????
.
.
.
.
.
..
...
....
मच्छर:- कारण त्या वेळीस तरुणी पुर्ण कपडे घालायचेना........

हिरे

हातातल्या रुमालाने नाक साफ केल्यानंतर काही जण त्या रुमालाकडे एकक्षण बघतात.
का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..त्यांना काय आपल्या नाकातुन हिरे बाहेर यावेत अशी अपेक्षा असते का??????????
:-D :-D :-P

Friday, April 20, 2012

रिश्वत

पुलिस वाला अपने पुत्र से: ‘तुम्हारा रिजल्ट अच्छा नहीं आया है, आज से तुम्हारा खेलना-टीवी देखना बंद।
’पुत्र: ‘ये लो 50 रुपए और बात को यहीं दबा दो।
’Hahaha.....

Thursday, April 19, 2012

आलोच मांजरीचा कीस घेवून...

तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो, पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा कीस घेवून...timepass

माती खातोय..

अर्ज किया है ...
..
..
उसने जिस जिस जगह रखे कदम हमने वो जमीं चुमली .
.
.
.
.
.
वाह....वाह ......
.
.
.
.
उसने जिस जिस जगह रखे कदम हमने वो जमीं चुमली ...
.
.
.
.
.
.
.
और उस बेवफा ने घर आके कहा.
.
.
.
.
.
.
.
.
काकू तुमचा मुलगा माती खातो..........................:P

बॅडलक

आमच्यासोबत असे का कधी होत नाय ?
पाऊस पडताना किती बी वारा आला तरी,
तिची छत्री उडत नाय..
बस मध्ये बाजूच्या सीट वर, एखादी पोरगी कधीचं बसत नाय..
एखाद्या पोरीचा, Wrong Number वाला Call येत नाय..
असा तसा कसा बी चालत असलो तरी, येक बी पोरगी समोरून धडकत नाय..
Stand वर उभा असलो कि, कुठली बी पोरगी DairyMilk खाताना दिसत नाय..
बोललो ना, च्यामारी आमचे BadLuck च खराब हाय.:

आजोबा

टोपीवाल्याची गोष्ट आठवते का लहानपणीची???
आता त्याचा रिमेक ऐका...
एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो, म्हणून झाडाखाली विश्रांती घेतो...
उठून पाहतो तर झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात...
त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने आपटतो...
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण करत नाहीत....
उलट १ माकड दात दाखवून बोलतो,
"काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते का???" :-D :-D

स्कुलबस ड्रायव्हर

चम्प्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागे बसून बडबडत असतो.जर माझी आई हत्तीन आणि बाबा हत्ती असते तर मी छोटा हत्ती असतो..
जर माझी आई वाघीण आमी बाबा वाघ असते तर मी छोटा वाघ असतो..
जर माझे आई वडील जिराफ असते तर मी पण छोटा जिराफ असतो..
ड्रायवर हे सगळं ऐकून कंटाळून बोलतो..
आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेकुब असले असते तर तू काय झाला असतास ?
.
.
.
.
.
चम्प्या - मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो..

काजु बदाम

एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची.
ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टर ला रोज बदाम काजू खायला द्यायची.
एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई ला विचारले...
कि आजी मला रोज काजू बदाम खायला का देते?
म्हातारी बाई म्हटली बेटा आता मी म्हातारी झाली आहे..
.
.
.
.
.
.
आणि त्यामुळे दात पण पडलेत,
काजू बदाम नुसते चघळून फेकून देन चांगल नाही

Monday, April 16, 2012

आय लव्ह यु, दादा..

चम्या : चींगे, डार्लिंग ,माझ्यासाठी असं काही बोल की ज्याने मला एकाचवेळी आनंद आणि दु:ख दोन्ही होईल..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चिंगी : आय लव्ह यू, दादा!!

एकीचे बळ

‘ एकीचे बळ ‘
ह्याचं उत्तम उदाहरण
.
.
.
एकट्याने सिग्नल तोडा..
पोलीस लगेच पकडतील..
.
.
.
.
.
.
.
तोच जर ५-७ जणांनी एकसाथ तोडला तर कुणाच्या बापाला बी नाही गवसणार कोणी बी..
True fact...
चंप्याच्या बायकोची मराठी थोडी कच्ची,,,
तिला फुल स्टॉप कुठे द्यायचा ,तेच नाही कळत.
तरी तिने चंप्याला पत्र लिहिले आणि मग फुलस्टॉप देउन टाकले मधे मधे..
ते पत्र असे.
"प्रिय प्राणनाथ,
तुमची आठवन येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतोय कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करतांना ब्लेड लागले वहिनीला. दवाखान्यात एडमिट केलं बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार तुमची लाडकी..

रिचेकीँग

डॉक्टर (चम्याला) : तुमची १ किडनी फेल झाली आहे. चम्या आधी खूप खूप रडला....,
मग डोळे पुसत बोलला,
.
.
.
.
RECHECKING मध्ये निघेल का?? :D :D
डॉक्टर बेहोष चम्या मदहोश........

विजेचा खांब

एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस ओरडला,
”अत्रे तुम्ही कुत्रे....”
काही वेळ सर्वत्र शांतता पसरली...
.
.
.
.
.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब आणि मोटारीचे टायर”.. :-D :-D
( खूप कमी लोकांना जोक समजलाय, तुम्हाला समजला तरच लाईक मारा.. :p )

रोमॅन्टिक मॅसेज

मंग्या : माझ्या एका मित्राने काळ माझ्या मोबाईल मधून माझ्या गर्ल्फ्रेन्डचा नंबर चोरला....
.
.
झंप्या : मग रे ???
.
.
.
.
मंग्या : काही नाही रे मुर्खासारखा कालपासून स्वतःच्याच बहिणीला Romentic मेसेजेस पाठवतोय...

कापुस

डॉक्टर कडे फोन ची बेल वाजते..
पलीकडचा माणूस-"कापूस आहे का?"
डॉक्टर-"हो आहे की.."
पलीकडुन-"थोडा काढा आणि खीशात ठेवा.."
परत १० मी. फोन येतो.....
पलिकडचा माणुस-"कापूस आहे का?"
डॉक्टर-"आहे की.."
पलीकडुन-"थोडा काढा आणि खीशात ठेवा.."
डॉक्टर फ़ार चिडतो-"आता येवू देत फोन बघतोच.."
पुन्हा बेल वाजते..
पलीकडचा माणुस-"डॉक्टर साहेब, कापूस आहे का?"
डॉक्टर जोरात ओरडतो-" नाही.. का?"
पलीकडचा माणुस-"चिडता कशाला, खिशातला काढा की..

लाइट गेले होते

सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून...

चान्स

चिंगी - जर चान्स भेटला तर माझ्याशी लग्न करशील चम्प्या???
.
.
.
.
.
.
.
चम्प्या - जर चान्स भेटला तर लग्न करायची काय गरज आहे...
कळालं त्यांनी लाईक करुन शेअर करा...
बाकीच्यांनी POGO लावा...

Saturday, April 14, 2012

चश्मा

डॉक्टर -आपका वजन कितना है?
मरीज -चश्मेँ को लेकर 75 किलो ।
डॉक्टर -और चश्मेँ के छोड़कर ।
.
.
मरीज -पता नहीँ बिना चश्मेँ के दिखता ही नहीँ है.
☺ ☺ ☺ ☺ ☺ ☺

तुझा भाउ बोलतोय..

एक अनोळखी कॉलतो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....
वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे .......:(
.
.
.
थोड्या वेळानंतर आणखीन एक अनोळखी कॉलतो:-हे तुला bf आहे का ?? :P
ती :-नाही नाही मला नाहीये...:x
तो:-मी तुझा bf बोलतोय...
तू आज माझ हृदय तोडलीस...:(
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....
मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय तो:-आता पकडली गेलीस ....
मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो....

तुझा भाउ बोलतोय..

एक अनोळखी कॉलतो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....
वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे .......:(
.
.
.
थोड्या वेळानंतर आणखीन एक अनोळखी कॉलतो:-हे तुला bf आहे का ?? :P
ती :-नाही नाही मला नाहीये...:x
तो:-मी तुझा bf बोलतोय...
तू आज माझ हृदय तोडलीस...:(
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....
मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय तो:-आता पकडली गेलीस ....
मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो....

संजीवनी

हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते......
.
.
.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही..

किडन्या

चिंटू: आपल्या दाताची कालजी कोण घेत???
डॉक्टर: कोलगेट..
चिंटू :कशी ??
डॉक्टर :ते दाताला किडन्यापासून वाचवतात...
चिंटू :पण किडन्या तर पोटात असतात ना ???? :D :)

Friday, April 13, 2012

प्रेम कथा..

प्रेम कथा......
एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून जात होते, मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत होता, मुलगी घाबरली तिने त्याला हळू चालवायला सांगितले....
मुलगा : मला आय लव यु बोल...
मुलगी : आय लव यु, आता तरी हळू चालव...
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आतातरी हळू चालव......
मुलगा तिला बोलला कि आता माझे Helmet काढ आणि ते तू घाल.....
मुलीने ते Helmet घातले आणि त्याला मोटारसायकल हळू चालवायला सांगितले...
.
.
.
दुसऱ्‍या दिवशी पेपरात बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण पावला पण ती मुलगी Helmet मुळे काहीही इजा न होता वाचली.. कारण त्याला माहित होते कि मोटारसायकलचा Break fail झाला होता...! :

दारुचा पाढा

दारू एके दारू, बैठक झाली सुरु,
दारू दुने ग्लास, मज्जा येई खास,
दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाइन,
दारू चोक्क बिअर, टाका पुढचा गिअर,
दारू पंचे रम, विसरून जावू गम,
दारू सक्खे ब्रान्डी, हाणा चिकन हंडी,
दारू सत्ते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की,
दारू अठ्ठे चिवडा, चखणा शेव- चिवडा,
दारू नववे कंट्री, मारा परत एन्ट्री,
दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाला....

लव्हलेटर

गंपू: किती मुश्कील आहे यार टीचर शी प्रेम करणे
झंम्पू: का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू : अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर वेडीने assignment समजून खाली sign केली आणि वरून कॉमेंट पण लिहिली कि अक्षर सुधारावे आणि चक्क १० पैकी ७ मार्क पण दिलेत.

Wednesday, April 11, 2012

गुंतवणुक

एकदा एका भिकाऱ्याला १ करोडची लॉटरी लागली...!!!!
.
.
.
.
तर त्याने एक मोठे मंदिर बनविले..!!!
.
.
.
त्याचा मित्र भिकारी: काय रे तू मंदिर का बनविलेस..???
.
.
.
पहिला भिकारी: आता याच्या समोर फक्त आणि फक्त मीच बसणार आणि भीक मागणार...!!!
.
.
“याला म्हणतात गुंतवणूक”

धोका

चम्प्याला या आधी २ सुंदर मुली होत्या..
पण त्याला एक मुलगा हवा होता....
त्याची इच्छा पूर्ण झाली..
त्याला एक मुलगा झाला..
पण दिसायला अगदी काळा आणि मेंदाड...
चम्प्या चिंगीला ओरडून - तू मला धोका दिलाय..
माझ्या दोन्ही मुली इतक्या सुंदर..
आणि मुलगा इतका काळा..?
.
.
चिंगी - अहो खरच सागते..
या वेळी मी तुम्हाला धोका नाही दिला.....!!!

काळाचे प्रकार

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात??
.
.
.
पक्या : ३ प्रकारचे..!
भूतकाळ..!
वर्तमानकाळ..!!
भविष्यकाळ..!!!
.
.
.
.
.
.
गुरूजी : अरे वा.!!!
एक उदाहरण दे पाहू??
.
पक्या :काल तुमचा मुलीला पाहिलेल..!
आज प्रेम झालं..!!
उद्या पळवुन नेईन..!!! :D:D :P

किसपर गया है?

Jab bacha paida hota hai to sare khandaan wale use dekhne aatay hain.
Bachche ka baap kehta hai:
"Mere bete ka chehra to mere pe gaya hai."...
Chacha kehta hai: "is ke haath pair to bilkul mere par gaye hain.
" Maa kehti hai: "iss ki naak mere pe gayi hai.
" Mamu kehta hai: "iss k kaan mere par gaye hain.
"Phir jab wahi bacha bada hokar Ladkion ko Chedta hai to sare khandan wale kehte hain: "PATA NAHI HARAMKHOR KISPAR GAYA HAI?
:D:D:D:D:D:D:D:D:P:D

चिअरगर्ल्स

आयपीयल चा सामना........
बॅटसमन छक्का मारतो ....
ऑस्ट्रेलियातून आलेला प्रेक्षक : ooohhh what a shot man!!!
इंग्लंड मधून आलेला प्रेक्षक : awesome hit!!!
वेस्ट ईंडीज मधून आलेले प्रेक्षक : He is fantastic man that was a great!
बांगलादेशी चाहते : वा भाई क्या शॉट मारते है ये लोग
आणि आपला प्रेक्षक : आयला आता चियरगर्ल्स नाचणार!!!!!!

मी टिव्ही पाहत होतो ना...

सरदारजी कडे चोरीः
एका सरदाराने पोलिसांकडे तक्रार केली,
'' सर माझ्या घरातल्या सगळ्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.....
फक्त एक टीव्ही सोडून''......
पोलिस - ''आश्चर्य आहे ...
चोराने टीव्ही कसा काय नाही नेला?''
.
.
.
.
.
.
सरदार ''मी टीव्ही पाहत होतो ना''

विन्डोज्

झंप्या - मित्रा तुझा कोणी सुतार ओळखीचा आहे कारे?
माझा Computer बिघडला आहे रे..
.
.
.
.
,
चंप्या - अरे पण जर Computer बिघडला आहे तर Engineerla बोलवना......
...
...
झंप्या- नाही रे ते काय आहेना माझ्या Windows चा प्रॉब्लेम आहे ना.....
चंप्या शॉक्स झंप्या रॉक्स...

Monday, April 9, 2012

टाइमपास

कळी

अशाच एका सकाळी सहज भेटली एक कळी ....
कळी खूप नाजूक होती..
तरी फुलावे वाटे तिला सर्वांसाठी...
कधी वारा तिज त्रास देई..
लटपटे शरीर पण तशीच उभी राही..
पाऊस खुपच कधी वेगाने बरसू पाही.
अस्तित्व टिकवायची धडपड सारे जग पाही....
तशीच फुलू पाही ती जोमाने...
जरी झाला व्याकुळ ह्या उंन्हाने.....
देव नेहमीच तिची परीक्षा घेई...
का असे ?
तिने कधी प्रश्न केला नाही....
नेहमीच ती आघात सोसू पाही..
तरी खोटे हास्य नेहमी ओठतून वाही..
प्रवास ना माहीत तिज तिच्या आयुष्याचा....
तरी एक संघर्ष सगळी नाती टिकवण्याचा....
सुकली जरी ती,तरी नवा जन्म घेईल...
असंख्य वादळे पुन्हा झेलेल..
अस्तित्व स्वताचे टिकवून ठेवेल..
एक दिवस तीचाच येईल...
रंग तिच्या आयुष्याचे पुन्हा खुलतील.....

फेसबुक

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी ,
श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती.
कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.
Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना 'virus' लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang झालेय PC सारखी मातीची स्थिती वाईट जाती माती जोडणारी कुठेच नाही website एकविसाव्या शतकातली पीढी भलतीच 'cute' contact list वाढत गेली संवाद झाले mute computer च्या chip सारखा माणूस मनानं खुजा झालाय
अन 'mother' नावाचा board, त्याच्या आयुष्यातून वजा झालाय floppy Disk Drive मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही अन फाटली मनं सांधणारा internet वर धागा नाही विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक रक्ताच्या नात्यांनाही आता लागते facebook................
धन्यवाद.

नेपोलियन बोनापार्ट

अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आसमची सायकल बाहेर काढली.
ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्या कडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो
‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप- ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’
तो- ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.

Sunday, April 8, 2012

टाइमपास नेटवर्क

टाइमपासः
1.Facebook
http://www.facebook.com/on.timepass
2.twitter
http://www.twitter.com/timepass_portal
3.Google+
http://plus.google.com/111253593070482931485
4.Blogger
http://www.timepassportal.blogspot.com
5.facebook account
http://www.facebook.com/timepass.portal

फेसबुक

Jab Se India Mein Facebook Aaya hai..
Bohat sari Changes Hui hai...
1. Sadko Pe Jagda Bandh, Ab Pages Pe Gali Galonch Hoti hai ...
2. Couples Garden Chorrh k FB inbox Mein Milte hai..
And Smiles KisSes Replaced by Emotions..Muwah .. Ha ha he.. Rofl Lolz Lmao etc!:
D3. Ab Politcals Social Issues faCebook Pe Aagaye ...
4. Ladke Ab Nukadh Pe Nahi, Pages Pe Ladkiyan Chedte hai ... :P
JAI HO !
FACEBOOK Padhega India,Tab He Toh Badhega India... ! ;)

Monthly pass

प्रिन्सिपल :- सर्वांसाठी लास्ट वार्निंग आहे, पुन्हा जर कोणी मुलगा "Girls Hostel" मध्ये गेला तर फाईन भरावा लागेल....
एकदा गेलात तर १००, दुसर्यांदा गेलात तर २००, तिसर्यांदा गेलात तर ३०० रुपये फाईन बसेल.........
.
.
एक झोलर उभा राहतो..
.
.
.
.
.
.
.
झोलर :- अरे टकल्या, "Monthly Pass" कितीचा बनेल..

गाढव दारु पित नसतो!

शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला,
पण गाढव पाणीच प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो ...

Saturday, April 7, 2012

तुम्ही पिता का?

डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत होत.
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा.. :D:P

Google+

लाइक करा आपले पेजः टाइमपास आता Google+ वर
https://plus.google.com/111253593070482931485

लिँबाचे झाड

मास्तर: बोल झंप्या, समुद्रात जर लिंबाचे झाड असेल तर तु लिंबू कसे तोडशील..बरं ?
झंप्या: मास्तर, सोप्प आहे मग मी पक्षी बनेल की..!
मास्तर: तुला माणसा पासुन पक्षी काय तुझा बाप बनवणार का ..?
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या: तर मग समुद्रात लिंबाचे झाड काय तुमचा बाप लावणार काय..?..:P

Friday, April 6, 2012

कहर पुणेरी पाट्यांचा

कहर पुणेरी पाट्यांचा
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता.
तेवढ्यात त्याला पाटी दिसली.
त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय 'जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी 'तर दुसर्याववर ' मांसाहारी 'तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती ,
' भारतीय बैठक 'तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल 'तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.
आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख' तर दुसर्याावर 'उधार' तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला. वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तो अचंबीत झाला.
त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला ,'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल नाही.