एक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्या करड्या रंगाच्या तिन गोळ्यांकडे एकटक पाहत बसला होता. तेवढ्यात तिथे संतासिंग आला.
संताने त्या दारुड्याला विचारले, '' या कशाच्या गोळ्या आहेत?'
'दारुड्याने उत्तर दिले, '' अकलेच्या गोळ्या ... या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते''
'' असं आहे का? ... मग मला एक दे की'' संताने त्याच्या हातातली एक गोळी घेवून खाल्ली आणि वरुन पटकन पाणी पीले.
थोड्या वेळाने संता म्हणाला, '' मी एक गोळी खाल्ली आहे खरी .. पण मला तर काही फरक वाटत नाही आहे''
'' तुला कदाचित अजुन गोळ्या घ्याव्या लागतील... तेव्हा कुठे फरक पडेल'' दारुडा म्हणाला.
म्हणून संताने अजून एक गोळी घेवून वरुन पाणी पिवून गिळली.
थोड्या वेळाने संताने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला. त्याने त्या गोळीचा बारीक तूकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघू लागला.
अचानक त्या गोळीचा तूकडा तोंडातून थूकून टाकत संता म्हणाला, '' काबे... याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे''
तो दारुडा म्हणाला, '' बघ... आता कशी तूझी अक्कल वाढत आहे''
No comments:
Post a Comment