पहिल्या भेटीचे ते कासावीस झालेलं मन
त्या भेटीचा तो क्षण,
मला भेटून तुझ्या मनाला मिळालेली ख़ुशी
त्या खुशीत आपल्या डोळ्यातनं गळलेला अश्रु ,
तू विसरू शकशील का………
तुझ्या दुखात माझं तुला सावर्ण
तुझ्या सुखात माझं तुला साथ देणं,
तुझ्या रागाचा नाकावर दिसून येणं
मग माझं तुला प्रेमाने मनाव्ना,
तू विसरू शकशील का………
प्रेम तर मी खूप केलं
तुझ्या शरीराशी नाही पण तुझ्या मनाशी,
कारण तुझ्या शरीरा पर्यंत कधीच पोहोचायचं न्हवतं
पोहोचायचं होता तर ते तुझ्या मना पर्यंत,
आणि मी तुझ्या मना पर्यंत पोहोचलो सुधा
त्याच मनाच्या खोल दरीत जाऊन त्याला आवरून विचार
तू विसरू शकशील का……
No comments:
Post a Comment