बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.....!
पोळा श्रावण
अमावास्या
या तिथीला साजरा करण्यात
येतो.पोळ्यास
बैलपोळा असे देखील
म्हणतात.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त
करणारा हा सण
आहे.ज्यांचेकडे
शेती नाही ते
मातीच्या बैलाची पूजा करतात.
शेतीप्रधान
या देशात, व
शेतकऱ्यांत
या सणाला विशेष
महत्व आहे.या वेळेस
पावसाचा जोर
कमी झालेला असतो.शेतात
पिक/धान्य
कापणीला आलेले असते.
सगळीकडे हिरवळ
असते. श्रावणातले सण
संपत आलेले
असतात.एकुण आनंदाचे
वातावरण असते.
या दिवशी,
बैलांचा थाट असतो.
या दिवशी त्यांना कामापासुन
आराम असतो.
तुतारी(बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात
येणारी काडी ज्याचे
टोकास,
बैलांना टोचण्यासाठी टोकदार
लोखंडी खिळा लावला असतो)
वापरण्यात येत
नाही.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण
(आवतण) देण्यात येते.
पोळ्याला त्यांना नदीवर/
ओढ्यात नेउन धुण्यात
येते. नंतर चारुन
घरी आणण्यात येते.
या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान
व शरीराचा जोड-
खांदा) हळद व तुपाने
(सध्या महागाईमुळे
तेलाने) शेकल्या जाते.
त्यांचे पाठीवर
नक्षिकाम केलेली झुल
(एक प्रकारचे
चादरीसारखे आवरण),
सर्वांगावर गेरुचे
ठिपके, शिंगांना बेगड,
डोक्याला बाशिंग,
मटाट्या (एक
प्रकारचा श्रुंगार)
गळ्यात कवड्या व
घुंगुरांच्या माळा,
नवी वेसण, नवा
कासरा
(आवरायची दोरी)
पायात चांदीचे
वा करदोड्याचे तोडे,
खायला गोड
पुरणपोळी व सुग्रास
अन्नाचा नैवेद्य.
बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी'
घरगड्यास नवीन कपडे
देण्यात येतात.
No comments:
Post a Comment