Sunday, August 19, 2012

अती शहाणा त्याचा बैल रिकामा

पुणे रेल्वे स्टेशनवर एक तरुण सोलापूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढला.
ज्या डब्यात तो चढला, त्या डब्यातखूप गर्दी होती. म्हणून याने शक्कल लढवली.
मोठ्या-मोठयाने तो साप साप म्हणून ओरडूलागला. डब्यातले सगळे लोक भीतीनेखाली उतरले.
हा मात्र मोठ्या रुबाबात डब्यातल्याएका सीटवर जाऊन तोंडावर पेपर ठेवून झोपी गेला.
जवळपास दीड-दोन तासाने त्याला जाग आली.
तसा तो उठला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या माणसाला त्याने विचारलं,"कोणतं स्टेशन आलं हो ?"
माणूस म्हणाला,"पुणेस्टेशन."
"काय? पुणे स्टेशन?",
तो तरुण गोधळून म्हणाला.
"होय, या डब्यात साप होता म्हणून गाडी हाडबा इथेच सोडून सोलापूरला गेली,"

No comments: