Friday, August 17, 2012

Nach Re Mora - नाच रे मोरा

नाच रे मोरा.... ग.दि.माडगूळकर ( बालगीते,अंगाई गीते,संस्कारगीते,स्फूर्तीगीते संग्रह ) महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना गदिमा या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे अण्णा तर नातवंडांचे पपाआजोबा अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर..... तुकारामाची गाथा जशी पाण्यात न बुडता तरंगत राहिली तसेच गदिमांनी लिहिलेले शब्द हे काळाच्या ओघात विरून न जाता प्रत्येक जणाच्या मनात अजूनही तरंगतआहेत. पूरिया, जोगिया यासारखे काव्यसंग्रह असोत किंवा 'या चिमण्यांनो' 'माझा होशिल का?' ' जिंकू किंवा मरू' यांसारखे गीतप्रकार असोत. गदिमांचे शब्द हे प्रत्येकांच्या मनाशी अगदी अलगदपणे संवाद साधतात. गीतरामायणाशिवाय तर घरात रामजन्म साजरा होतचं नाही. "नाच रे मोरा" ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात 'चंदाराणी','शेपटीवाल्या प्राण्यांची','एक कोल्हा बहु भुकेला','चांदोबा चांदोबा भागलास का?' यांसारखी बालगीते किंवा 'जिंकू किंवा मरू','वंद्य वंदे मातरम्‌' सारखी

No comments: