"मास्टर माईंड गण्या"
प्रत्येक रविवारी गण्या आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू गण्याच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.
धर्मगुरु गण्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनण्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याचीखुप मनधरणी केल्यानंतर गण्या अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने गण्याच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, ''तु धर्माने सिख हिंदू, आणि हिँदू म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस''
गण्याचे शेजारी खुप खुश झाले होते...
पण...
.
.
.
पुढील रविवारी पुन्हा गण्याच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला.शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा गण्याच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्याघरात शिरलेआणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, तेव्हा ते अचानक थांबले आणिआश्चर्याने गण्याकडे पाहू लागले.
तिथे गण्या एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम्ही पवित्र बटाटे आणि टमाटर आहात'' :p :D :D
आवडला तर नक्कीच शेअर करा ;)
No comments:
Post a Comment