Friday, March 9, 2012

सिक्रेट

चम्या:- तुला कोणाकडून हि पैसे हवे असतील ना तर फक्त मला तुमची सिक्रेट माहित आहे असे फक्त म्हणायचे.
रम्या:- मस्तच
रम्या घरी जातो, बाबाना म्हणतो:- मला तुमची सिक्रेट माहित आहेत, बाबा त्याला ५०० रु काढून देतात.
आई कडे जातो:- आईला म्हणतो:- मला तुझी सिक्रेट्स कळली आहेत. आई त्याला २००० रु देते.
बाहेर पडतो आणि शेजारील लोलु काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो मला तुमची सिक्रेट कळली आहेत.
लोलु काका:- ये, एकदा तरी वडिलांना मिठी मार.

No comments: