श्री कृष्ण जन्माष्टमीच्या...शुभेच्छा...!!!
|| श्रीकृष्ण जन्म ||
श्रावण मांसी, कृष्ण अष्टमी | मथुरा बंदीशाळेला |
देवकी वसुदेवाच्या उदरी | अवतार जन्माला आला || १ ||
आठव्या वेळी देवकीला हो | आनंदाचे डोहाळे |
"विश्वाचा मी चालक आहे" | स्वयं विष्णू ऐसे बोले || २ ||
रिमझिमणा-या जलधारांची | तेंव्हा होती बरसात |
देवकीला हो दर्शन घडले | श्री विष्णूंचे साक्षात् || ३ ||
देवी देवकी त्यास म्हणे की | "पुत्र होउनी तू यावे |
विश्वंभराची माता म्हणुनी | विश्वाने या ओळखावे || ४ ||
तिमिर सरला, प्रकाश भरला | बालप्रभूच्या तेजाने |
"गोकुळी सोडा, माझ्या परिसा | तुम्ही वायू वेगाने" || ५ ||
वसुदेव तो उचलुनी ठेवी | निज पुत्राला परडीत |
त्या कंसाच्या दुष्कृत्त्याने | श्वास कोंडला नरडीत || ६ ||
शेल्याखाली झाकुनी घेता | परडी घेई डोईला |
कृष्णकन्हैया दावू लागला | अवताराच्या दिव्य लीला || ७ ||
तुटल्या बेड्या कड्याही सुटल्या | रक्षणकर्ते
निद्रिस्त | देवलिलेच्या त्या साक्षीने | अमंगलाचा हो अस्त || ८ ||
कृष्ण मस्तकी होउनी छत्री..!!
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा....!!
3 comments:
awesome blog mitra
aaplyala layi aavadla
@[367035903331518:0]
लय भारी BLOG आहे भावा
आपल्याला लयी आवडला.
लयी भारी BLOG
आपल्याला लयी आवडला
Post a Comment