Tuesday, August 14, 2012

पण राग येतोच का म्हणून...??

...पण राग येतोच का म्हणून?
जे
इच्छेविरुद्ध घडते, जे स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो! म्हणूनच तर आपण सारेच रागावत असतो. कुणी अधूनमधून, कुणी सतत, कुणी प्रमाणात, कुणी प्रमाणाबाहेर, कुणी दुसऱ्यावर, कुणी स्वत:वर! परिणामांचा विचार करून किंवा त्याचा विचार करता! राग हे "रसायन' नेमके आहे तरी काय, याविषयी
...
मूल जन्म घेते, ही गोष्ट आपल्या दृष्टीने आनंदाची असते; पण त्याच्या शांत, स्वतंत्र अशा गर्भाशयातील जीवनाला एकदम अडथळा निर्माण होऊन गुदमरण्याची शक्यता वाटताच पहिल्या श्वासासाठीची धडपड (फाईट ऑर फ्लाईट ब्रेन रिस्पॉन्स) आणि त्याचे रडणे, ही खरे तर बाळाने व्यक्त केलेली पहिलीवहिली भावना - म्हणजेच त्याचा राग!
म्हणजे येतानाही इच्छा नाही आणि जातानाही इच्छा नाही आणि जे इच्छेविरुद्ध घडते, जे स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो! म्हणूनच तर आपण सारेच रागावत असतो. कुणी कधीतरी, कुणी सतत, कुणी प्रमाणात, कुणी प्रमाणाबाहेर, कुणी दुसऱ्यावर, कुणी स्वत:वर! परिणामांचा विचार करून किंवा त्याचा विचार करता!
"रागावणे चुकीचे' हे दुसऱ्याला सांगण्यासाठी! पण मी रागावलो ते योग्यच होते, असे समर्थन करणारे असतात कितीतरी जण.
एक गंमत सांगतो कुणावरही रागावणे तसे सोपे असते; पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य कारणासाठी, योग्य शब्दांत आणि योग्य प्रमाणात रागावणे फार कठीण काम आहे! अशा पद्धतीने रागावणारी माणसे किती आहेत, याचा आता आपल्याला शोध घ्यावा लागेल. त्याआधी आपण थोडी रागावर चर्चा करू या!
रागाच्या व्याख्या पुढील प्रकारे करता येतील.
-राग ही एक मनाची अवस्था आहे. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते.
-मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया होय.
-अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची प्रतिकार यंत्रणा असते.
रागाचे परिणाम
-रागावणारी व्यक्ती ज्या व्यक्तीवर रागावते, त्या व्यक्तीस मानसिक त्रास होतो. रागाचे प्रमाण जास्त आणि अयोग्य असेल तर समोरच्या व्यक्तीमध्ये नैराश्याची; तसेच तीव्र रागाची भावना निर्माण होऊ शकते. नंतर तो कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. यातून भांडण-तंटा, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटना घडू शकतात.
-साधारणपणे आपल्या जवळच्या म्हणजे घरातील व्यक्तीवरच राग व्यक्त करण्याची सवय असते. कारण बाहेर आलेला राग त्या ठिकाणी व्यक्त करता येऊ शकल्याने अशा व्यक्ती तो राग दडपून टाकते. मग घरी आल्यानंतर ज्या व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत किंवा मृदू स्वभावाच्या आहेत, त्यांच्यावर हा राग काढला जातो. म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर!
-या अशा सतत व्यक्त होणाऱ्या रागामुळे घरातील मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यामध्ये भीती, नैराश्, न्यूनगंडाची भावना आणि त्यातूनही पुन्हा रागाचा उद्रेक होऊन तो इतरांना घातक ठरू शकतो. म्हणूनच कौटुंबिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो.
-राग अनावर असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. नातेसंबंध बिघडतात, कामावर समाजव्यवस्थेचा परिणाम होतो.
-रागीट स्वभावाची व्यक्ती जर उच्चपदस्थ असेल तर रागाच्या भरात त्याने घेतलेला निर्णय समाजासाठी घातक ठरू शकतो.
रागावणाऱ्या व्यक्तीवर होणारे परिणाम
या व्यक्तीमध्ये
-मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.
- अस्वस्थता, बेचैनी, नैराश्याची भावना, मंत्रचळेपणा; तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते.
-काही रागीट व्यक्तींमध्ये राग, पश्चात्तापाची भावना, नैराश्, व्यसनाचा आधार आणि पुन्हा राग, पश्चात्ताप, नैराश् त्यातून इतरांना किंवा स्वत:ला इजा पोचवण्याची ऊर्मी अशी मालिका दिसून येते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.
-एकूणच रागामुळे काहीही होऊ शकते. म्हणतात ना, अती राग आणि भीक माग!
आणखी एक गंमत !
-राग ही सर्वांमध्ये असलेली सर्वसाधारण भावना आहे.
-जी आपल्याला ओळखता आली पाहिजे.
-ती नियंत्रित करता आली पाहिजे.
-ती परिपक्व झाली पाहिजे.
-ती जपता आली पाहिजे.
-आणि मग ती आपल्याला फायदेशीर पण ठरू शकते.
-ज्यातून जीवन जगण्याची प्रेरणाही मिळते.
रागाची कारणे
) जीवशास्त्रीय घटक- टेंपोरेल लोब आणि लिंबिक सिस्टीम कारणीभूत
-विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था
- ऍड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण
- डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग
) अनुवांशिक घटक - रागाची भावना आनुवंशिक असू शकते.
- XYY सिंड्रोम असणाऱ्या व्यक्ती
- अनुवांशिक व्यक्तीमत्व दोष
) मानसशास्त्रीय कारणे - तीव्र स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती
- चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणाऱ्या व्यक्ती
- चिकित्सा करता मत बनवणाऱ्या व्यक्ती
- संशयी, आनंदी वृत्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्ती
-न्यूनगंड, लैंगिक दमन
सिग्मंड फ्रॉईडचे मत जीवनविषयकप्रेरणा आणि मृत्यूविषयक विनाशी सुप्त प्रवृत्ती या दोन्हींचा ताण आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत माणसाच्या अशा वागण्याच्या मुळाशी असते.
लॉरेंझचे मत प्रत्येक सजीवामध्ये इतरांबरोबर सामना करण्याची उपजत वृत्ती असते. त्यातून संघर्ष आलाच !
आजची सामाजिक कारणे
व्यक्तीच्या अंगभूत जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय बाबी जशा त्याच्या रागास कारणीभूत असतात, तसे समाजातील काही घटकदेखील आजच्या तरुणांमधील रागाचे कारण बनलेले आहेत.
- समाजव्यवस्था आणि त्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना.
- वाढती लोकसंख्या आणि जीवघेणी स्पर्धा
- गर्दी आणि घुसमट
- रोजच्या गरजांसाठी करावा लागणारा संघर्ष
- राजकारणातील भ्रष्टाचार
- श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढत चाललेली दरी
- जातीयवाद आणि भेदभाव
-अंधश्रद्धा
- मीडिया हीरोला राग आलाच पाहिजे. कारण तो तत्त्वासाठी भांडतो. हाणामारी करतो आणि शेवटी तो जिंकतो. ही गोष्ट तरुणांमध्ये लवकर रुजते. आणि त्याच पद्धतीने आपणही वागावे, असे त्याला वाटू लागते.
-दूरदर्शनवरील मालिकांमुळे घराघरांतील समीकरणे बदलत आहेत.
राग व्यक्त करण्याचे प्रकार
1) शारीरिक सकर्मक-प्रत्यक्ष हाणामारी / शारीरिक इजा किंवा प्राणघातक हल्ला
2) शारीरिक सकर्मक-अप्रत्यक्ष दुसऱ्या माणसांच्या मदतीने समोरच्या व्यक्तीला शारीरिक इजा पोचवणे किंवा प्राणघातक हल्ला करणे
3) शारीरिक अकर्मक-प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीला त्याला हव्या असणाऱ्या गोष्टीपासून जबरदस्तीने परावृत्त करणे
4) शारीरिक अकर्मक-अप्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीला हवी असलेली मदत मुद्दाम करणे
5) मानसिक सकर्मक-प्रत्यक्ष व्यक्तीचा अपमान करणे
6) मानसिक सकर्मक-अप्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीबद्दल अफवा पसरविणे
7) मानसिक अकर्मक-प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीशी बोलण्याचे टाळणे
8) मानसिक- अकर्मक-अप्रत्यक्ष समोरची व्यक्ती संकटात असेल तर मदत करता तटस्थ राहणे
रागीट स्वभावाची माणसे आपल्या रागाचे समर्थन असे करतात -
- तुम्हाला मी आधीच सांगतो, मी खूप रागीट स्वभावाचा माणूस आहे. माझ्याशी वाकडेपणा घेऊ नका.
- मला खोटे बोललेले अजिबात खपत नाही.
- या घरात माझाच शब्द प्रमाण आहे. मी जे म्हणतो तसेच होणार!
- मी बघतो एकेकाला!
- मला सांगू नकोस, मी उडत्या पक्ष्याची पिसे मोजतो!
- मला विरोध करणारा अजून जन्मायचाय!
- तुझे जगणे मुश्किल करीन. अमूक अमूक म्हणतात मला!
- चल चालती हो! तुझ्यासारख्या छप्पन्न मिळतील मला!
- माझ्या दारात यायचे नाही. मी तुला मेलो आणि तू मला मेलास!
आणि अशी किती तरी...!
याउलट
काही वर्षांनंतर आयुष्य जेव्हा उतरणीला लागते, आयुष्य-सूर्याचा अस्त दिसायला लागतो, तेव्हा याच माणसांकडून खालील वाक्ये ऐकायला मिळतात -
-मी त्यावेळी तिला/त्याला असे तोंड सोडून बोलायला नको होते.
-थोडा संयम ठेवला असता तर तो प्रसंग मी टाळू शकलो असतो.
-आयुष्याची किंमत आता कळते.
-आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा. माणसाने माणसाशी दोन शब्द चांगले बोलले पाहिजे.
-आयुष्यभर लोकांना धाकात ठेवून तू काय मिळवलेस?
-आता वाटते, दुरावलेली माणसे जवळ यावीत; पण माझा स्वाभिमान आडवा येतो.
पण याच्याही पुढे काही महाभाग असतात, ते कधीच बदलत नाहीत.
बघा-
-मी आयुष्यभर कुणाला भीक मागितली नाही. आताही मागणार नाही.
-मी ज्या पद्धतीने वागलो, तेच बरोबर. "बळी तो कान पिळी' हेच मला पटते.
ही झाली काही उदाहरणे. अशी किती तरी माणसे तुम्ही तुमच्या आजूबाजूला शोधू शकता. अगदी तुमच्यासहित!
पण रागीट माणसांमध्ये काही गोष्टी तुम्हाला दिसतील त्या अशा-
- या व्यक्ती उतावळ्या स्वभावाच्या असतात.
- त्यांच्यात परिपक्वता कमी असते.
-सय् परिस्थितीची चारी बाजूंनी चिकित्सा करता लगेच मत व्यक्त करण्याकडे त्यांचा कल असतो.
-माझेच सर्वांनी ऐकावे, असे त्यांना वाटत असते.
-अशा व्यक्तीमध्ये न्यूनगंडाची आणि नैराश्याची भावना सुप्त प्रमाणात असू शकते.
-अशी माणसे स्वत:वरच नाराज असू शकतात; पण तसे दाखवत नाहीत.
-अशी माणसे व्यसनाधीन असू शकतात.
-या व्यक्तींना मूड डिसऑर्डर, स्किझोफ्रनिया, पॅरानोइया, डिप्रेन, ओसीडी (मंत्रचळेपणा) असे मनोविकार जडू शकतात.
रागावर नियंत्रण
-पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे.
-इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे.
-आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे
-समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वत: आहोत, अशी कल्पना करणे.
-आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे
-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे.
-आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.
काही उपाय
-संवाद साधण्याची कला प्रत्येकाने आत्मसात करावी.
-आपण आजपर्यंत किती माणसे जोडली, किती माणसे तोडली, याचा हिशेब करावा.
-इतरांना दोष देणे, त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे, हे किती योग्य आहे, याचा विचार करणे.
-आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागणे यात कमीपणा नाही.
-सतत उत्साही आणि उद्योगी राहावे.
-आपल्यामुळे इतर माणसेही कशी उत्साही राहतील, यासाठी प्रयत्न करावा.
आणि शेवटी
-आपले मन तरी आपल्याशी संवाद साधते आहे का, हे त्यालाच विचारावे आणि त्याला हेही विचारावे की "तू काय शोधत आहेस?, तुझे काय हरवले आहे?, तुला काय हवे आहे?'
बाहेरच्या देवाला साकडे घालण्यापेक्षा आणि नवस बोलण्यापेक्षा मनाच्या गाभाऱ्यातील मनोदेवतेलाच साकडे घालावे, मनात शांतता नांदावी म्हणून! 

1 comment:

Anonymous said...

hi all timepassportal.blogspot.com owner discovered your website via Google but it was hard to find and I see you could have more visitors because there are not so many comments yet. I have discovered website which offer to dramatically increase traffic to your blog http://xrumer-services.net they claim they managed to get close to 4000 visitors/day using their services you could also get lot more targeted traffic from search engines as you have now. I used their services and got significantly more visitors to my blog. Hope this helps :) They offer best services to increase website traffic Take care. Roberto