Saturday, May 19, 2012

माय

आईची महिमा सांगनारी कविताः
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय?
आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायचा माजे आटला होता पान्हा !
पिटा मंदी र पिटा मंदी !
पिटा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय!
तवा मले पिटा मंदी दिसते माझी माय?
तान्या काट्या वेचायला माय जाई राणी !
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवाणी !
काट्या कुट्या र काट्या कुट्या !
काट्या कुट्याला हि तीच मानतनसे पाय !
तवा मले काठ्यामंदी दिसते माझी माय ?
बाप माझा रोज लावी मायचा माग तुम्ह्ना बस झाल शिक्षण आता घेऊ दे हाती काम !
शिकुंषण र शिकुंषण ! शिकुंषण कुठ मोठा मास्तर होणार हाय ?
तवा मले मास्तरामंदी दिसते माझी माय ?
दारू पिऊन मायला मारी जवा माझा बाप !
थर थरार कापे अंग छातीला लागे धाप ?
कासयाचा र कासयाचा !
कासयाचा गाव्रणी ला बांधली जशी गाय !
तवा मले गाईमंदी दिसते माझी माय ?
ग बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी !
संग म्हणे राजा तुजी दिसेल कवा राणी ?
भर्या डोळ्यान भर्या डोळ्यान !
भर्या डोळ्यान जवा पाहीन दुधा वरची साय
तवा मले साईमंदी दिसते माझी माय ?
हंबरून वासराले! म्हणून म्हणतो पुन्हा एकदा भरावी तुजी वटी!
पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी !
तुझ्या चरणी , तुझ्या चरणी!
तुझ्या चरणी ठेऊन माथा धराव तुज पाय ?
तवा मले पायामंदी दिसते माझी माय ?
हंबरून वासरले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय ?

No comments: